121

मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. ऐकुन सगळ्यांना आश्चर्य वाटेल, पण या गेमच्या मागील मास्टरमाईंड एक 17 वर्षाची रशियन मुलगी आहे. रशियात राहणाऱ्या या 17 वर्षाच्या मुलीवर अनेक मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे ?याबद्दलची माहिती पोलिसांनी अजून उघड केली नाही. डेअली मिररने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांच्या मते, ही मुलगी खेळाच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना तिने दिलेला आदेश ऐकला नाही,तर घरातील इतर व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देते. या गेममधील पीडित मुलांना ब्लेडच्या सहाय्याने स्वतःवर वार करायला, भितीदायक सिनेमे बघायला तसंच अर्ध्या रात्रीत उठायचे टास्क दिले जातात. गेम खेळणाऱ्या मुलाला नुकसान पोहचविण्याचा या मागील हेतू असतो.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेली मुलगी ही सुसाइड गेम ग्रुपची अॅडमीन होती. ब्लू व्हेल गेमच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना ती धमक्या द्यायची. तिने मुलांना दिलेला आत्महत्या करण्याता आदेश त्यांनी ऐकला नाही, तर तुमच्या आई-वडील, भाऊ-बहिणीला मारून टाकायची धमकी ती मुलगी द्यायची. रशियाच्या गृह मंत्रालयानुसार, ही मुलगी पीडित मुलाला 50 टक्के टास्क देते, ज्याचा उद्देश मुलांना मानसिक त्रास देण्याचा असायचा. आणि खेळाच्या शेवटच्या टास्कमध्ये त्यांना आत्महत्या करायला लावण्याचा असायचा.

ही मुलगी ‘डेथ ग्रुप अ‍ॅडमिनिस्ट्रेटर’ अशीच ओळखली जात आहे, असे रशियाच्या चौकशी यंत्रणेनं म्हटलं आहे. ती स्वत: ब्लू व्हेल चॅलेंज खेळाडू होती. तिने आत्महत्येकडे नेणारं आव्हान पूर्ण केलं नाही. त्याऐवजी ती त्या खेळाची अ‍ॅडमिन बनली. या ग्रुपवरील कित्येक डझन सदस्यांना ही मुलगी बहुतेक वेळा जीव जाण्याचीच शक्यता असलेली आव्हाने पाठवायची, अशी माहिती समोर आली आहे.
... See MoreSee Less

View on Facebook

महामार्गांवरील दारुबंदी महापालिका क्षेत्रांसाठी नाही : सुप्रीम कोर्ट

महामार्गांच्या पाचशे मीटर अंतरातील दारुची दुकानं जर महापालिकेच्या अखत्यारित येत असतील, तर यापुढे त्यांच्यावर दारुबंदी नसेल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील महामार्गांलगतची परवानाधारक दुकानं पुन्हा सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामधील मृत्यू यांचे प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 15 डिसेंबर 2016 रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या 500 मीटर परिसरातील दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयात सुधारणा करुन सुप्रीम कोर्टाने हा नवा निर्णय दिला आहे.

दारुबंदीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी राज्य सरकारनं तात्काळ काही रस्ते स्थानिक प्रशासनाला हस्तांतरित केले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने ही बाब स्पष्ट करुन सांगितली आहे.

राज्यातील सुमारे 25 हजार दारु विक्रीच्या परवान्यांपैकी 15 हजार परवाने रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आली, तर राज्याचा 7 हजार कोटींचा महसूलही बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
... See MoreSee Less

View on Facebook

Happy Independence Day
Please Like and Share ThisVideo
Also Please Subscribe Our YouTube channel Media9tv
... See MoreSee Less

View on Facebook

Happy Independent Day
Please Share and Like This Video
And Please Subscribe Media9tv on youtube
... See MoreSee Less

View on Facebook

तळोजा: पनवेल वाहतूक विभाग आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त कारवाईत तळोजा-खारघर रस्त्यावरील रेती वाहतूक करणाऱ्या ३१ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून खारघर पोलिसांनी वाहने ताब्यात घेतली आहेत.
बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी पनवेल महसूल विभागाला दिली होती. त्यानुसार शुक्रवारी (१६ जून ) तहसीलदार दीपक आकडे आणि पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत या वाहनांवर धाड टाकून कारवाई केली. ही सर्व वाहने तळोजा तसेच बाजूच्या रहिवाशांच्या मालकीची आहेत. या गाड्या वाहतूक नियमांचे पालन न करता चालवल्या जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. रेतीची रॉयल्टी व चलन या बाबींची पूर्तता केली असल्याचे निदर्शनास आले असून फक्त ओव्हर लोड भरुन ही वाहने चालवली जात होती. त्यामुळे फार मोठ्या संख्येने वाहनांवर कारवाई करण्यात आले असली तरी, केलेल्या कारवाईत फार काही हाती लागले नाही, हेच दिसून येत आहे.
... See MoreSee Less

View on Facebook

पत्रकारावर हल्ला केल्यास ३ वर्षे कारावास
पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारं विधेयक अखेर महाराष्ट्र विधानसभेत आज मंजूर करण्यात आलं आहे. यानुसार आता पत्रकार वा माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होणार आहे. तसेच पत्रकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे.

'महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७' या नावाने हा कायदा अस्तित्वात येणार आहे. आज विधानसभेत चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात आलं.

विधेयकातील तरतुदी

- प्रसारमाध्यमातील नियमित किंवा कंत्राटी तत्वावर नियुक्त पत्रकार या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. त्यात संपादक, वृत्तसंपादक, उप संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस आणि मुद्रितशोधक यांचा समावेश आहे. व्यवस्थापन किंवा प्रशासकीय पद असलेल्या व्यक्तीला या कायद्याचं संरक्षण नसेल.

- वृत्तपत्र म्हणजेच मुद्रित किंवा ऑनलाइन नियतकालिक, वृत्तपत्र आस्थापना, केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी असलेली वृत्तवाहिनी हे या अधिनियमाच्या कक्षेत असतील.

- पत्रकार वा माध्यमसंस्थेवरील हल्लेखोरास तसेच हल्ल्याची चिथावणी देणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील, अशी तरतूद करण्यात आली आहे.

- या कायद्याचा गैरवापर केला गेल्यास संबंधित पत्रकार व संस्थेलाही तेवढीच शिक्षा भोगावी लागणार आहे. याबरोबरच संबंधिताची अधीस्वीकृती पत्रिका कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल व कोणतेही शासकीय लाभही मिळण्यास तो पात्र नसेल.

- या अधिनियमाखालील गुन्ह्याचा तपास पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत होणार आहे.

- प्रसारमाध्यमातील प्रतिनिधी किंवा प्रसारमाध्यम संस्थेच्या मालमत्तेची नुकसानभरपाई आणि वैद्यकीय खर्चाची रक्कमही गुन्हेगाराला अदा करावी लागणार आहे. ही रक्कम न दिल्यास जमीन महसुलाची थकबाकी होती असे समजून ही रक्कम वसूल केली जाणार आहे.
... See MoreSee Less

View on Facebook

Media9tvnews added a new photo. ... See MoreSee Less

View on Facebook

हेडलाईन्स वर एक नजर


✅- काही वेगळं आहे असं वाटत नाही. मी अजूनही तसाच आहे, फक्त मला कर्णधार करण्यात आलं आहे इतकंच - विराट कोहली.

✅- सनबर्न फेस्टिवलमध्ये फ्रेंच डीजे डेव्हिड गेटाचा कॉन्सर्ट उद्या होणार, मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाल्याचा आयोजकांचा दावा.

✅- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला.

✅ लष्करात स्मार्टफोन वापराला बंदी नाही- लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे स्पष्टीकरण

✅- हरियाणा - गुरगाम येथे झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार मुलांचा होरपळून मृत्यू.

✅- डोपिंग प्रकरणातील आरोपासंदर्भात कुस्तीपटू नरसिंग यादवने सीबीआयकडे नोंदवला जबाब. लवकरच कुस्तीच्या मैदानावर परत येईन अशी अपेक्षा आहे, नरसिंह यादवची प्रतिक्रिया.

✅ नाशिक : महापौर अशोक मुर्तडक, पोलिस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झेंडा दाखवून नाशिक रनला उत्साहात सुरुवात, विविध वयोगटातील नागरिक सहभागी.

✅मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांच्यातील मतभेद लवकरच मिटतील आणि दोघेही एकत्र प्रचार करतील, अशी मला खात्री आहे - गौरव भाटिया, सपा नेते

✅ अकोला-खामगाव महामार्गावर नॉनस्टॉप बसने दुचाकीस्वारास उडवले, दुचाकीस्वार ठार

✅- उल्हासनगर - भाजपा कार्यकर्ता गुरदीप सिंगवर हल्ला, 20-25 जणांनी धारधार शस्त्रांनी केला हल्ला.

✅ - मकरसंक्रांती आणि लोहरीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा.
✅ भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी प्रकरणी पोलिसांनी 39 वर्षिय इसमाला केली अटक

✅- रणजी फायनल: नायरची 91 धावांची झुंजार खेळी, मुंबईचं गुजरातसमोर 312 धावांचं आव्हान

✅- पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये सेना युतीसाठी सकारात्मक, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणेंची माहिती, भाजपाही हेवेदावे मागे ठेवणार
... See MoreSee Less

View on Facebook

🅾नाकाबंदीत सापडलेले पाकिट परत करण्याचा पोलिसांचा प्रामाणिकपणा

नवी मुंबई : नाकाबंदी दरम्यान रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट संबंधिताला सन्मानाने परत देण्याची कामगिरी रबाले पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केली आहे.

१७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नाकाबंदी दरम्यान रबाले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील आणि पोलीस हवालदार देशपांडे यांना रस्त्यात एक पैशाचे पाकीट पडलेले निदर्शनास आले. यावेळी त्यांनी पाकीटाची तपासणी केली असता त्यात रोख ५९ हजार ३६० रुपये आणि व्हिजीटींग कार्ड मिळून आले.

सदर व्हिजीटींग कार्ड महेश सुर्वे नामक व्यक्तीचे असल्याने त्यावरील मोबाईलवर संपर्क साधून पोलिसांनी खातरजमा केली. यानंतर महेश सुर्वे यांना त्यांचे पैशाचे पाकीङट परत घेण्यासाठी रबाले पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.

त्यानुसार रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील आणि पोलीस हवालदार यांनी महेश सुर्वे यांना त्यांचे पाकीट पैशासह सुपूर्द केले.
... See MoreSee Less

View on Facebook

For Any News Event’s

Contact Us / Whats App on

+918655556626
+917387413999

or 

email – media9tvnews@gmail.com

About Us

Media9 News Network propagates news content resourced for each major region, country, city, and state, in addition to each major industry sector, business and sports. Together with its signature Media9 News Network .com portal, eNewspaper sites and News.Net network, Media9 News Network is the largest online news service on the Web.

Media9 News Network , in addition to its own journalists, is contracted to a number of news wires, and sources material from municipalities, government sites around the world, NGOs, law enforcement agencies, localised sources, government media, press releases, and official bodies. and others – while utilising its spidering software to generate content and links from several thousand external sites. Spidered stories are used to supplement Media9 News Network ‘s customised content because of the extensive range of its coverage which extends to 400 categories of news comprising every key location in the world in addition, to an extensive range of topics which include numerous sub-categories in the area of business, technology, markets, finance, sports, entertainment, Internet, and more.

Powering its own network of sites in addition to its signature portal, and a host of external sites, Media9 News Network originates much of its news through its own in-house journalists, a number of news agencies but not Reuters or Associated Press. While recognising these two agencies as the world’ preeminent wire services, Media9 News Network has set itself on being a completely independent news service and has a focus on generating unique news content. While the extent of its number of categories and the number of sites it powers is such that it does not have the resources to populate those sites with all unique content, it is forever building up the percentage of unique coverage it does provide. Media9 News Network takes the view that a huge percentage of news media, newspapers, television, and radio stations subscribe to Reuters and Associated Press producing a sameness across many, many media outlets around the world in the area of news gathering and presentation. It is for this reason Media9 News Network has avoided adding these services to its arsenal of content generators. Media9 News Network is one of the oldest news services operating on the Web and one of the largest in existence. Its aim is to continue improving its service and sites, developing more and more unique content, and extending its reach through social media to generate considerable growth in its readership volumes.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *